Ad will apear here
Next
आनंद भाटे यांना वैष्णव पुरस्कार जाहीर
पुणे : स्वरभास्कर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य, प्रसिद्ध शास्त्रीय गायक आनंद भाटे यांना कै. ह. भ. प. विश्वनाथ महाराज इंगळे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘वैष्णव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

कलाश्री संगीत मंडळ व एबीआयएलतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘नामाचा गजर’ या कार्यक्रमात भाटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पाच जुलै २०१९ रोजी मयूर कॉलनी येथील एम. ई. एस. बालशिक्षण मंदिर प्रशालेच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

या पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून, अकरा हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आनंद भाटे हे किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक असून, ठुमरी व नाट्यसंगीत ही त्यांच्या गायकीची खासियत आहे. त्यांनी अगदी लहान वयातच संगीत शिकण्यास सुरुवात केली. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी दूरदर्शनवर पहिले गायन सदरीकरण केले. त्यानंतर सुरू झालेला हा सांगीतिक प्रवास आजवर अखंड सुरू असून, रसिक श्रोत्यांचेही त्यांना भरभरून प्रेम मिळत आहे. बालगंधर्व चित्रपटाच्या पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय प्रभा अत्रे पुरस्कार, आनंदगंधर्व पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZILCB
Similar Posts
रंगला विठ्ठल ‘नामाचा गजर’... पुणे : ‘जय जय रामकृष्ण हरी’च्या गजरात सुरांचा आनंद घन रसिकांवर बरसला, अन् विठ्ठल नामाचा गजर सभागृहभर दुमदुमला... निमित्त होते एबीआयएल व कलाश्री संगीत मंडळ यांच्या वतीने आयोजित ‘नामाचा गजर’ या संतरचना आणि अभंग यांवर आधारित सांगीतिक कार्यक्रमाचे.
पुणेकर भिजले ‘नामाच्या गजरा’त पुणे : ‘जय जय राम कृष्ण हरी...’, ‘लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा...’, ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली...’, ‘या पंढरीचे सुख...’, ‘अवघा रंग एक झाला...’ या आणि यांसारख्या अनेक संतरचना आणि अभंगांच्या सादरीकरणाने पुणेकरांना वारी पुण्यात येण्याआधीच नामाच्या गजरात चिंब भिजविले. निमित्त होते कलाश्री संगीत मंडळ
भक्तीरसाचा अनुभव देणारा ‘नामाचा गजर’ पुणे : ‘जय जय रामकृष्ण हरी...’, ‘विठ्ठल विठ्ठल...’च्या जयघोषात भक्तिभावाने वारकरी पंढरीची वाट चालू लागतात. त्याच भक्तीरसाची अनुभूती देणारा अभंग आणि संतरचनांवर आधारित ‘नामाचा गजर’ हा सांगीतिक कार्यक्रम सलग पाचव्या वर्षीही होत आहे.
‘पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’त सुरांची बरसात पुणे : बरसणाऱ्या पाऊस धारांसोबत सुरांच्या बरसातीचा पुणेकर रसिकांनी मनमुराद आनंद घेतला. राग मधुकंस, दुर्गा, बिहाग, बागेश्री, मारुबिहाग यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’चे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language